Sunday, August 18, 2019

मुल्क - दवडलेली सुवर्णसंधी

काल मुल्क बघितला.

'सिल्व्हेस्टर स्टॅलॉन' चा 'फर्स्ट ब्लड' सिनेमा सुरू व्हावा आणि संपेसंपेपर्यंत त्याचा 'सुनील शेट्टी' चा 'बलवान' मूवी बनावा  तसं काहीसं झालं. एक सुंदर कन्सेप्ट, धाडसी प्रयत्न, तगड्या कलाकारांची पूर्ण फौज, सुंदर दिग्दर्शन एवढं असूनही जर चित्रपट शेवटी अपेक्षित उंची आणि परिणाम नं साधता एका
सर्वसाधारण चित्रपटाप्रमाणे 4 टाळीबाज वाक्ये फेकून संपण्यात धन्यता मानत असेल तर त्यात काय मजा राव. जे सत्य आहे ते काळजात भिनायला नको का? तसा परिणाम साधण्यासाठी थोडी अजून मेहनत न टाकता, शेवट असा का बरं गुंडाळलाय? अडीच तासांच्या मूवी मध्ये एवढ्या mature topic मध्ये नवं परखड सत्य आणायचं की जे माहीत आहे त्यावरच दात कोरून चित्रपट संपवायचा?

तसा मूवी वाईट नाही आहे, खरं तर प्रत्येकानं एक वेगळा मूवी म्हणून एकदा बघावा असाच आहे, पण ह्या कन्सेप्ट मध्ये अशी black friday सारखी अजरामर कलाकृती होण्याची ताकत असताना, असा साधासुधा चित्रपट काढणं म्हणजे अंबानींनी मुलीच्या लग्नात सर्वाना बोलवून त्यांची स्वहस्ते फक्त फदफदं-भात वाढून बोळवण केल्यासारखं नाही का होणार?

Casting, acting आणि direction चांगलंच आहे. पण उत्तमोत्तम कलाकार, बेस्ट कन्सेप्ट, आणि अखेरीस प्लॉट मात्र develop होताना एकदमच साधासुधा आणि अपरिणामकारक. कथेला, प्लॉट्स ना शून्य महत्व देऊन, सुंदर चित्रपटनिर्मितीची संधी अक्षरशः स्वहस्ते वाया घालवली आहे. का रे बाबा असं केलंस?

ऍमेझॉन चं आपल्या उंचीएवढं मोठं बर्थडे गिफ्ट यावं आणि मस्त चकचकीत wrapped बॉक्समध्ये बॉक्स काढता काढता अखेरीस 10 रुपयांचा नेलकटर निघावा तसं वाटलं

Acting सूंदर आहेच।
आशुतोष राणा चा अभिनय लाजवाब। तो पूर्ण मूवीत आशुतोष राणा आहे असं त्यानं भासुच दिलं नाही। एकदम वेगळं टोनिंग। मनोज पहावा ला पहिल्यांदा छान रोल मिळाला आणि त्यानं केला देखील मस्त। तापसी आणि ऋषी ला चांगला रोल दिलाय।

पण ऋषी कपूर ला acting साठी एवढे लांब लांब डायलॉग  नाही दिले तरी चालतील हो, तो खूप ताकदवान ऍक्टर आहे। चेहर्यावरून बोलूंद्यात की त्याला।

 रजत कपूर, नीना गुप्ता मागचे उधार चुकवायसाठी नुसतं add केलंय असं वाटलं। दोघाना काहीच स्कोप आणि screentime नाही आहे।

 2:30 तास वातावरण निर्मिती केल्यानंतर खूप साधारण आणि अपेक्षित शेवट, क्लायमॅक्स ला काहीच वेगळं नसलेलं नाट्य. Judge चा अंतिम सामाजिक मेसेज खूपच अतिउथळ वाटला.  ह्याच्यापेक्षा लोकं आजकाल whatsapp वर बरं लिहितात की.
थोडक्यात, कथेमध्ये प्लॉटस आणि घटनांची प्रचंड वानवा वाटली।

इनमिन 2-3 गोष्टीवरच मध्यन्तरानंतरचे कोर्टातले युक्तिवाद दाखवलेत।
 पूर्ण सव्वा तासांच्या कोर्ट scenes मध्ये surprise elements नावालाच एखादं दुसरा असावा। बाकी फक्त उगाचच वारंवार भावनिक ओलावा ।  बरं मूवी इमोशनल म्हणावं तर background music खूपच साधारण वापरलंय। आणि तसे बरेच scenes जमलेतही, नाही असं नाही, पण नाईलाजाने अशा अल्पसंतुष्टी वृत्तीनेच ह्या चित्रपटाला सखोल आणि अप्रतिम कलाकृती होण्यापासून वंचित ठेवलंय

शेवटीशेवटी इतक्या आक्रस्ताळेपणे वकील बाजू मांडताना बघून चुकून दामिनी बघतोय की काय असा भास झाला।

शेवटचं प्रत्येक वकिलाचं आणि जजचं closing argument इतकं सपक आणि बुळबुळीत का दाखवलंय ते काही कळालं नाही।

इतकी heavy starcast घेऊन, इतका मस्त विषय निवडून असा सूंदररीत्या सुरू होणारा मूवी शेवटपर्यंत पोचता पोचता अतिसाधारण बनून गेलाय असं वाटलं.

अर्ध्या पानाच्या मूळ कथेवर पूर्ण अडीच तासाचा चित्रपट काढल्यासारखा वाटला। कथेचा जीव असावा शॉर्ट फिल्मचा आणि त्यात भावनिक प्रसंग टाकत टाकत अडीच तासांचा मूवी बनवण्यात काय मजा आहे राव? बहुतेक लेखकाला त्यांनी, 'बाबारे, ही घे concept. आम्ही जेवून येतो, तोपर्यंत ह्यावर छान कथा लिही', असं सांगितलं असावं.

दिग्गज फलंदाजांची आणि गोलंदाजांची फौज लावून आपण, झिम्बाब्वे विरुध्दची match अगदी मरत मरत एका रन ने जिंकली तर संधी वाया घालवल्याचं दुःख मानायचं की कसंबसं जिंकल्याचा आनंद???

Wednesday, July 13, 2016

मला आवडलेल्या गझल्स - शाम-ए-फिराक

फैज अहमद फैज हे एक सिद्धहस्त शायर होते. त्यांची एक एक ओळ एवढी अर्थपुर्ण असायची आणी शब्दांची निवड तर कल्पनेपलीकडील होती.

आज आपण त्यांची एक गझल वाचू. माझ्या खूप आवडत्या गझल्स पैकी ही एक आहे.

पहिल्यांदा आपण काही शब्दांचे अर्थ बघू आणी मग गझल वाचूया | उर्दू मध्ये बहुतेक वेळी शब्दार्थ हा आजू बाजूच्या अर्थावरून वेगळ रूप घेतो, त्यामुळं ह्या शब्दांचा वापर त्या वाक्याच्या अर्था प्रमाणे थोडाफार बदलतो.

1. शाम-ए-फिराक = evening of separation, विरहाची/एकटेपणाची सायंकाळ,

२. बज्म = सभा, पण इथे contextually बज्म-ए-खयाल चा अर्थ होईल, "प्रेयसीच्या विचारांच्या कल्लोळात"

३. हिज्र = ताटातुट, separation from beloved.

४. आखिर-ए-शब = end of night, twilight, period before morning, रात्रीची अखेर, इथे मुद्दामच पहाट हा शब्द वापरला नाही आहे कवीनं

५. सबा = a gentle breeze, मंद वाऱ्याची झुळूक

=====================================================

शाम-ए-फिराक अब ना पूछ, आई और आ के टल गई
दिल था कि फिर बहल गया , जां थी कि फिर संभल गई

बज़्म-ए-ख़्याल मे तेरे हुस्न की शमा जल गई
दर्द का चांद बुझ गया हिज्र की रात ढल गई

जब तुझे याद कर लिया सुबह महक महक उठी
जब तेरा गम जगा लिया रात मचल मचल गई

दिल से तो हर मुआमला करके चले थे साफ हम
कहने मे उनके सामने बात बदल बदल गई

आख़िर-ए-शब के हमसफ़र "फैज़" ना जाने कहाँ गए
रह गई किस जगह सबा, सुबह किधर निकल गई

- फैज अहमद फैज
===================================

Ask no more about the night of separation. It just came and passed.
The heart got diverted again but still life found its feet again.

In the salon of mythoughts, the candle of your beauty was lighted.
The moon-of-pain extinguished itself, the night of separation slipped away.

Whenever you were remembered, the mornings became fragrant
when your pain was awakened, the nights grew restless.

In the heart I had sorted out all the issues before appearing out in front of her, but as soon as I saw her, some how my words changed themselves.

And Faiz, where did those  fellow-travellers of the end-of-the-night go?
Don't know at which spot did the breeze get left behind and which way did the dawn walked off.


===================================


ह्या मधल्या एका एका कडव्यावर बरंच काही आपण बोलू शकतो, विचार करू शकतो अशी आहेत ही कडवी.

म्हणजे आता किती सुंदर लिहिलंय की,
"त्या विरहाच्या रात्री बद्दल काही विचारू नका, कशी आली आणी कशी सरली.
पुन्हा माझ मन उचंबळून आलं, पण पुन्हा एकदा ह्या जीवान मला थोडं सांभाळून घेतलं." थोडं माझं मराठी परिपूर्ण नाही म्हणून थोडं  इंग्लिश चा आधार घेतो.
 I think he is trying to say how the life find the means to go on, despite the disappointment.
पण जर विचार केला तर हे "संभल गया" देखील आभासीच आहे.

आता बज्म ह्या शब्दाचा अर्थ आहे गर्दी पण त्याचा वापर बघा. "बज्म-ए-खयाल में तेरे हुस्न की शम्मा जल गइ" बघा. अप्रतिम. रात्रभर तळमळत जो हा तिचा विचारांवर विचार  करत राहिला तसतसं "हुस्न की शम्मा जल गइ".  Beloved's beauty turned into a magical light. वाह.

पुढच्या वाक्यात तर "दर्द का चांद बुझ गया". कसं काय सुचू शकत हे, खरंच. just like the dawn casts out the illusion of painfuly night, this moon-of-pain faded away and the ended the painful night of separation.

आता हे कडवं बघू की दिल से तो हर मुआमला....
कवी किती निरागसपणे सांगतोय की तो त्याच्या मनातल कसं बोलू शकत नाही आहे. He ends up saying different thing and says something else in nervousness, when she appears in front of him.

अप्रतिम गझल!!!!

ही गझल बऱ्याच गायकांनी म्हणली आहे. आबिदा परवीन, फरीदा खानुम, बेगम अख्तर, गुलाम अली ,आणी ह्या सर्वांची ती आवडती देखील आहे.




Tuesday, July 12, 2016

मला आवडलेल्या गझल्स - तूने ये फूल

आज आपण कतील शफाई यांची एक खूपच सुंदर गझल बघूया.

खूपच साधी, सरळ आहे, पण तेवढीच उत्कटही आहे.

-----------------------------------------------------
तूने ये फूल जो ज़ुल्फ़ों में सजा रखा है,
इक दिया है जो अंधेरों में जला रखा है ।

जीत ले जाये कोई मुझको नसीबों वाला,
 ज़िंदगी ने मुझे दाँव पे लगा रखा है।

इम्तिहाँ और मेरे ज़ब्त का तुम क्या लोगे,
मैंने धड़कन को भी सीने में छुपा रखा है ।

दिल था इक शोला मगर बीत गये दिन वो 'क़तील',
अब कुरेदो ना इसे राख़ में क्या रखा है

-
कतील शफाई

-------
शब्दार्थ:
 ज़ब्त = to keep, preserve; to withhold
--------------------------------------------------------------

मेहदी हसन यांनी ही गायलेली गझल नक्की ऐका



Sunday, July 10, 2016

मला आवडलेल्या गझल्स - बात करनी मुझे



बहादूर शहा झफर, ह्यांचा उदासी प्रकट करण्याचा अंदाज खूपच वेगळा आणी अतिशय भावणारा असायचा।

त्यांची एक गज़ल अशा विषयावर आहे की जिथे कवीचं बोलणंच स्तब्ध झालंय, त्यानें इतकी असहाययता कधीच अनुभवली नव्हती। ती देखील कशी वर्तवली आहे बघा।

----------------------------------------------
बात करनी मुझे मुश्किल, कभी ऐसी तो न थी
जैसी अब है तेरी महफ़िल, कभी ऐसी तो न थी ।

ले गया छीन के कौन आज तेरा सब्र-ओ-करार,
बेक़रारी तुझे ए दिल कभी ऐसी तो न थी।

उनकी आँखों ने खुदा जाने, किया क्या जादू,
के तबीयत मेरी माइल, कभी ऐसी तो न थी ।

चश्म-ए-क़ातिल मेरी दुश्मन थी, हमेशा लेकिन...
जैसे अब हो गई क़ातिल, कभी ऐसी तो न थी ।

क्या सबब तू जो बिगड़ता है, ज़फर से हर बार,
खू तेरी हूर-ए-शमाइल, कभी ऐसी तो न थी।

बात करनी मुझे मुश्किल, कभी ऐसी तो न थी
जैसी अब है तेरी महफ़िल, कभी ऐसी तो न थी ।
-
बहादूर शहा झफर
-------------------------------------------------

आज बघूया ह्या गझल च्या स्वैर अनुवादाचा प्रकार. (श्रेय: संजय क्षीरसागर / संदीप)

ती शून्य शांतता, तो असहाय्यतेचा, बेकसीचा रंग, सगळं बोलणंच मुश्कील झालंय, हे असं तुझ्या सोबतीत कधीच अनुभवलं नव्हतं.

तुझ्या मैफिलीचा रंग आज काही वेगळा आहे. सखी तू आज अकारण नाराज आहेस. तुझ्याशी सारखं बोलत राहावं असं वाटणार्‍याला देखिल, आज सुरुवात कशी करावी ते उमजत नाही. (प्रियकर स्वत:लाच विचारतो), तुझं स्वास्थ्य कुणी हिरावलं, इतकी बेक़रारी तर तुला कधीच नव्हती.
आणि थोड्या एका दुसर्‍या अर्थानं, तीच त्याचं हृदय आहे...आणी तो प्रियतमेलाच म्हणतोयं की, ‘बेक़रारी तुझे `ए दिल' कभी ऐसी तो न थी’!

तुझ्या नज़रेच्या या (उदास करणार्‍या) जादूनं, काय झालंय तर स्वतः मी देखिल उदास (माइल) झालोयं.

माझा वेध घेणारी तुझी नज़र क़ातिल तर आहेच. आणि एका नज़रेत ती मला तुझा करते म्हणून, माझी वैरीणही आहे...पण आज तुझी नज़र इतकी कातिलाना झालीये, विकल झालीये, की... मला बोलणंच मुश्कील झालंय.

तू अशी माझ्यावर सतत नाराज का असतेस? तू इतकी अंतर्बाह्य लावण्यवती आहेस, तुझा स्वभाव (खू तेरी), एखाद्या स्वर्गातून उतरलेल्या परीसारखा (हूर-ए-शमाइल) आहे. तुझ्या रुपासारखंच तुझं मन सुद्धा इतकं उमदं आहे की तुझ्यासमवेत असणार्‍यासाठी ही दुनिया जन्नत आणि तू हूर आहेस, आणि तरीही ह्या अशा स्वप्नवत स्थितीत, अश्या तुझ्या सहवासात (तेरी महफ़िल), हे असं का की मला बोलणं देखील मुश्कील व्हावं!!!!....

--------------------------------------------------------------------------------------------------
मेहदी हसनजींच्या आवाजातली, बहादूर शहा झफर यांची ही गझल नक्की ऐका.

मला आवडलेल्या गझल्स - पारा पारा हुआ


ही गझल तशी खूप मोठी आहे, पण सध्यापुरतं आपण तिचं एक छोटं version बघू.

ह्याचे शायर आहेत सईद राझीद हझमी.

------------------------------------------------

पारा पारा हुआ पैराहन-ए-जाँ
फिर मुझे छोड़ गये चारागराँ

कोई आहट, न इशारा, न सराब
कैसा वीराँ है ये दश्त-ए-इम्काँ

वक़्त के सोग में लम्हों का जुलूस
जैसे इक क़ाफ़िला-ए-नौहागराँ

-
सईद राझीद हझमी
-------------------------------------------------

शब्दार्थ :
पारा-पारा = टुकड़े-टुकड़े,
पैराहन-ए-जाँ = प्राणों का लिबास, शरीर,
चारागराँ = चिकित्सक, doctor,
सराब = मृगतृष्णा, मृगजळ,
वीराँ = वीरान,
दश्त-ए-इम्काँ = संभावनाओं का जंगल, सम्भावना क्षेत्र, संसार
सोग = शोक,
क़ाफ़िला-ए-नौहागराँ = शोक मनाने वालों का कारवां,  अंतयात्रा
---------------------------------------------------
अनुवाद (श्रेय : चारुदत्त कुलकर्णी यांची पोस्ट)

माझ्या आयुष्याच्या वस्त्राचे सगळे तुकडे तुकडे झालेत,
आणी माझ्यावर उपचार करणारे जे, तेच मला सोडून गेले !

ना काही पायाचे आवाज ; ना काही इशारे ; ना मृगजळाचे कसलेही आभास,
किती वैराण झाले आहे हे आता सगळे एकटेपणाचे वाळवन्ट!

हे म्हणजे, दुःखाच्या काळातला प्रत्येक क्षण साजरा करतोय उत्सव,
अगदी प्रेत यात्रेला चाललेल्या समूहासारखा!
-----------------------------------------------------

ही गुलाम अलींच्या आवाजातली गझल नक्की ऐका 

मला आवडलेल्या गझल्स - इक खलिश को


ह्या गझल चे शायर आहेत, अदीब सहरानपुरी.

------------------------------------
इक खलिश को हासिल-ए-उम्र-ए-रवां रहने दिया
जान कर हमनें उन्हें ना मेहरबां रहने दिया

कितनी दीवारों के साए हाथ फैलाते रहे
इश्क नें लेकिन हमें बेखानुमा रहने दिया

अपने अपने हौसले अपनी तलब की बात है
चुन लिया हमने उन्हें सारा जहाँ रहने दिया

यह भी क्या जीने में जीना है बैगैर उनके अदीब,
शम्मा गुल कर दी गयी बाकी धुआं रहने दिया

-
अदीब सहरानपुरी
---------------------------------------
काही अर्थ :
खलिश = pain, दर्द
रवां = moving or to continue
हासिल = gain
बेखानुमा = बेघर, कंगाल
---------------------------------------

ह्या सुंदर शायरीला त्याहूनही सुंदर चाल दिलीय आणि गाइलेत मेहदी हसन. त्यांच्या आवाजात ही गझल ऐकणे म्हणजे एक मस्त अनुभव आहे.

मला आवडलेल्या गझल्स - जिंदगी में तो सभी प्यार किया करते है

ही गज़ल कतील शफाई यांनी लिहिलेली आहे। खूप खूप वर्षांपूर्वी एक 'फर्माईश' नावाची magnasound ची वेगवेगळ्या गज़लच्या collection ची casette होती। त्यात ही गझल मी ऐकली होती.

ऐकायला खूपच गोड, अर्थपूर्ण आणि समजायला खूप सोपी अशी गज़ल आहे।



-----------------------------------------
ज़िंदगी में तो सभी प्यार किया करते हैं, मैं तो मर कर भी मेरी जान तुझे चाहूँगा

तू मिला है तो यह अहसास हुआ है मुझको, ये मेरी उम्र मोहब्बत के लिये थोड़ी है
इक ज़रा सा ग़म-ए-दौरां का भी हक़ है जिस पर, मैंने वो साँस भी तेरे लिये रख छोड़ी है
तुझ पे हो जाऊँगा क़ुर्बान तुझे चाहूँगा, मैं तो मर कर भी मेरी जान तुझे चाहूँगा
ज़िंदगी में तो सभी प्यार किया करते हैं, मैं तो मर कर भी मेरी जान तुझे चाहूँगा.......

अपने जज़बात में नग़मात रचाने के लिये, मैंने धड़कन की तरह दिल में बसाया है तुझे
मैं तसव्वुर भी जुदाई का भला कैसे करूँ, मैंने क़िस्मत की लकीरों से चुराया है तुझे ।
प्यार का बनके निगहबान तुझे चाहूँगा, मैं तो मर कर भी मेरी जान तुझे चाहूँगा।
ज़िंदगी में तो सभी प्यार किया करते हैं, मैं तो मर कर भी मेरी जान तुझे चाहूँगा.......

तेरी हर चाप से जलते हैं ख़यालों में चराग़, जब भी तू आये जगाता हुआ जादू आये।
तुझको छू लूँ तो फिर ऐ जान-ए-तमन्ना मुझको, देर तक अपने बदन से तेरी ख़ुशबू आये।
तू बहारों का है उनवान, तुझे चाहूँगा, मैं तो मर कर भी मेरी जान तुझे चाहूँगा |
ज़िंदगी में तो सभी प्यार किया करते हैं, मैं तो मर कर भी मेरी जान तुझे चाहूँगा |

-
कतील शफाई
----------------------------------------------



ही गज़ल 1973 च्या अजमात movie मध्ये देखील, मेहदी हसन यांनी गाईली होती। movie चे संगीतकार बहुदा नौशाद होते।