Wednesday, June 13, 2012

आ फिर से मुझे छोड के जाने के लिये आ....

मेहदीजींच्या निधनाची बातमी जीवाला चटका लावणारीच आहे.

त्यांची गझल कॉलेज मध्ये असताना पहिल्यांदा ऐकली. ती होती, 'मुहब्बत करने वाले कम न होंगे'. इतका अप्रतिम गोडवा असलेला आवाज, त्यांची गझल रंगवत गाण्याची अदा आणी रागांची निवड खरोखरीच वेड लावून गेली.
कॉलेज च्या काळापासून नेहमी त्यांच्या आणी गुलाम अलींच्याच गझल नेहमी ऐकत असायचो.
काल अचानक त्यांच्या नसण्याची बातमी आली अन् मनाला विषण्ण करून गेली.
देहानं जरी ते आपल्याला सोडून गेले असले तरी त्यांच्या गझल चा अमूल्य ठेवा ते आपल्यासाठी सोडून गेले आहेत, आता तोच ऐकत त्याची आठवण काढायची. बस्....


Monday, June 11, 2012

परंपरा - savani shende

ह्या शनिवारीच ठाण्यात, गडकरीत, 'परंपरा' हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम झाला. सावनी शेंडे आणी रघुनंदन पळशीकर ह्यांचं शास्त्रीय आणी भक्तीसंगीत गायन होतं.
त्यामध्ये सावनी शेंडे यांचा तर एकदम अफलातून performance होता .
त्यांनी रागेश्री म्हणला आणी रघुनंदन पळशीकरांनी संपूर्ण मालकंस गायला. एकदम सही.
सावनींच्या साथीला 'सानिया किर्लोस्कर' (माझी पुतणी) होती.
classical बरोबरच सावनींचं कविता वाचन, गझल आणी भक्तीसंगीत म्हणजे तर खरोखरच ऐकणार्यांची ऐश होती.
त्यांनी 'सावनी' हा प्रकार देखील गायला. त्यामुळे हा weekend एकदम मस्त गेला.

Thursday, June 7, 2012

नाटकं आणी पुस्तकं


ह्या blog वर post करून २ वर्ष तरी नक्कीच झाली असतील. जुई झाल्यापासून घरी अजिबातच वेळ मिळाला नाही. पण आता पुन्हा एकदा पोस्ट्स टाकण्याचं ठरवलं तरी आहे.

अलीकडेच २ सुंदर नाटकं बघेतली. प्रत्येकानं आवर्जुन पाहावीत अशी नाटकं आहेत ही.

१) फायनल ड्राफ्ट : एका लेखकाच्या ढासळलेल्या लिखाणावर जरी हे आधारीत असलं तरी थोडंफार आज काल आपण ज्या शैलीनं  कामं करतो, त्यामुळ हे सर्वानाच लागू असावं असं मला वाटतंय.
२) काटकोन त्रिकोण: म्हाताऱ्या माणसाची मनस्थिती आणी त्यांचा दृष्टीकोन एकदम हसत खेळत सांगता सांगता सिरीयस विचार करायला लावणारं नाटक आहे.

सध्या एक पुस्तक वाचायला घेतलंय:
चिंता : लेखक : डॉ. प्रदीप पाटकर
एकदम सुरेख पुस्तक आहे. छोटया छोटया गोष्टींची काळजी करत आपण नकळत कसं स्वतःचं आयुष्य वाया घालवतो त्यावर आहे.

आज एवढंच पुरे. असंच अधून मधून post करत नाही.